Edition

नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

loडॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

बालमंडळ कार्यक्रमात नाटिका, गीतांचे सादरीकरण.

सेलू : येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आकाशवाणी परभणी केंद्राच्या रविवारी, ‌‌९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३५ वाजता क्रांती दिनानिमित्त प्रसारित होणाऱ्या बालमंडळ कार्यक्रमात सहभाग आहे. यामध्ये शिक्षक तथा कवी डॉ.सुरेश हिवाळे लिखित आणि बाळू बुधवंत, प्रतिज्ञा चव्हाण दिग्दर्शित ‘ ग्रंथ माझे गुरू ‘ ही वाचन संस्कृतीवरील नाटिका आणि संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी संगीतबद्ध केलेले शिक्षक अशोक लिंबेकर, ज्येष्ठ कवी गौतम सूर्यवंशी लिखित गीतांचे प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमात सान्वी हेलसकर, शाश्वत संघई, मृण्मयी इक्कर, शब्दा लाटकर, ऋतुजा महाजन, तीर्थेश संघई, यश कुटे, सोहम नेवरेकर, गार्गी आकणीकर, पृथ्वीराज इंगळे, जय चौधरी या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या सहभागाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक किरण देशपांडे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, गणेश माळवे आणि शिक्षकांनी कौतुक केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!