Edition

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन वाढ व सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आमदार सत्यजित देशमुख यांनी दिल्लीत केंद्रीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी :
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमदार सत्यजित देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे.
नवी दिल्ली येथील केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयात जाऊन त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचा पाठपुरावा केला.
​आमदार सत्यजित देशमुख यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयातील ‘प्रोजेक्ट टायगर’चे अप्पर महासंचालक आणि ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा’चे सदस्य सचिव संजय कुमार, तसेच इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट डॉ. बी. क्लेमेंट बेन यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या बैठकीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासंदर्भात सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
​विशेष व्याघ्र संरक्षण दलाची मागणी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या व त्यांचा संचार विचारात घेता, स्थानिक नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे वाघांपासून संरक्षण व्हावे, यासाठी क्षेत्रात तातडीने ‘विशेष व्याघ्र संरक्षण दल’ स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी या बैठकीत केली.
​भूसंपादनाचे शेरे कमी करण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी
प्रकल्पातील मौजे खुंदलापूर आणि जनाईवाडी येथील भूसंपादनाबाबत नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार देशमुख यांनी विशेष जोर दिला. या दोन्ही गावांतील भूसंपादनाचे शेरे कमी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला असून, या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांसमोर मांडली.
​पर्यटन वाढीसाठी विविध विकासकामांवर भर
चांदोली राष्ट्रीय अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात निसर्ग पर्यटनाला मोठी संधी आहे. येथे पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित मार्ग आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध विकास कामे हाती घेण्याबाबतही या वेळी सकारात्मक चर्चा झाली.
​आमदार सत्यजित देशमुख यांच्या या आक्रमक पाठपुराव्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सुरक्षेचा प्रश्न सुटण्यासोबतच भूसंपादनाबाबत स्थानिक ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय अधिकाऱ्यांनीही या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

चौकट –
खुंदलापूर आणि जनाईवाडी येथील भूसंपादनाबाबत नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सत्यजित देशमुख यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही गावांतील जमिनीवरील वन विभागाचे भूसंपादनाचे शेरे कमी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला असून, या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांसमोर मांडली.त्याला सकारात्मक प्रतिसाद संबंधित अधिकाऱ्यांनी दिला.


फोटो ओळ – नवी दिल्ली येथे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयातील ‘प्रोजेक्ट टायगर’चे अप्पर महासंचालक, ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा’चे सदस्य सचिव संजय कुमार, इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट डॉ. बी. क्लेमेंट बेन यांच्या भेटी प्रसंगी आमदार सत्यजित देशमुख .

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!