Edition

आखाडीनिमित्त कोंबडा-कोंबडी बाजारात मोठी गर्दी; गावरान पक्ष्यांच्या दरात मोठी वाढ..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – आषाढ (आखाडी) महिन्याच्या पार्श्वभूमीवर आणि श्रावण महिना अवघ्या आठ दिवसांवर आल्याने सांगली जिल्ह्यासह वाळवा तालुक्यातील आठवडी बाजारांमध्ये कोंबडा-कोंबडी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. देवाला नैवेद्य दाखवणे, कुलदैवतांचा नवस फेडणे आणि आखाड पार्ट्यांचे आयोजन यामुळे गावरान कोंबडा-कोंबडीला मोठी मागणी निर्माण झाली आहे.
श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार टाळत असल्याने श्रावणपूर्वीच नागरिक मोठ्या प्रमाणावर मांसाहाराची खरेदी करत आहेत. त्यामुळे आठवडी बाजारांमध्ये सकाळपासूनच व्यापारी आणि ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. विशेषतः गावरान कोंबडे, काळ्या पिसांच्या कोंबड्या आणि कडकनाथ पक्ष्यांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.
वाढत्या मागणीमुळे गावरान पक्ष्यांचे दरही चांगलेच वधारले आहेत. नेहमी ४०० ते ५०० रुपयांना मिळणारा गावरान कोंबडा सध्या ९०० ते १,००० रुपयांपर्यंत विकला जात आहे. तर ३०० रुपयांच्या आसपास मिळणारी गावरान कोंबडी ७०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. लाल तुऱ्याचे, वजनदार आणि तंदुरुस्त गावरान पक्ष्यांना अधिक भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
देशी कोंबडा-कोंबडीची आवक मर्यादित असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागातून पक्षी संकलित करून बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. वाळवा तालुक्यातील परिसरातील विविध आठवडी बाजारांमध्ये दिवसभर मोठी उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले.
आखाडाचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने तसेच गटारी अमावस्या जवळ आल्याने येत्या काही दिवसांत कोंबडा-कोंबडी, चिकन आणि मटणाच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!