Edition

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन पासिंगचा खोळंबा: महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अधिकारी आक्रमक.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर/प्रतिनिधी:उदय साळुंखे

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने एका समस्येबाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १ ऑगस्ट २०२६ पासून कार्यालयामार्फत होणाऱ्या वाहनांची पासिंग बंद करण्यात आली असून, त्याऐवजी मशीनद्वारे पासिंग करण्याची सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र, युनिट बसवूनही मशीनची तपासणी अद्याप पूर्ण न झाल्यामुळे ही सेवा सुरू झालेली नाही. परिणामी वाहतूकदारांना व वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ जिल्हा समन्वय दिनेश परमार, करवीर तालुका अध्यक्ष दत्ताजी फरांडे, अरुण पाटील, भारत घसाले, तुषार जगदाळे, आणि ओमकार फराटे यांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे, अन्यथा ते आंदोलन करतील.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!