Edition

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कोरेगावात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोरेगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) गट व कोरेगाव तालुका परिवर्तन विचार मंचाच्या वतीने सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त कोरेगाव शहरातील जिल्हा प्राथमिक शाळा क्रमांक २ मधील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना जिलेबी वाटून जयंतीचा आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व परिवर्तन विचार मंचाचे कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी स्वराली बोतालजी हिने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रभावी भाषण केले.
कार्यक्रमास कोरेगाव नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, संपादक गणेश बोतालजी, नगरसेवक हेमंत बर्गे, गणेश धनवडे, माजी सरपंच मनोज येवले, प्रदीप बोतालजी, गणेश येवले यांच्यासह ज्येष्ठ नेते, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी, पोलीस, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मनिषा सोनवणे यांनी आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!