Edition

पेटीएम ला हायकोर्टाचा अंतिम दणका! पेमेंट्स बँक बंद करण्याचे आदेश; लाखो युजर्ससमोर पुढे काय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिल्ली वृत्तसेवा – दिल्ली उच्च न्यायालयाने पेटीएम पेमेंट बॅंक बंद करण्याचे आदेश देत बँकेच्या लिक्विडेशन प्रक्रियेला अंतिम मंजुरी दिली आहे. यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वारंवार नियमांचे उल्लंघन आणि नियामक अटींचे पालन करण्यात झालेल्या गंभीर त्रुटींचा ठपका ठेवत एप्रिल २०२६ मध्ये बँकेचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने ८ आणि २२ जुलै २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आदेश दिले.
न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक गिरीकुमार एम. नायर यांची अधिकृत लिक्विडेटर म्हणून नियुक्ती केली आहे. आता बँकेच्या संचालक मंडळाचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असतील आणि बँकेच्या मालमत्ता, दायित्वे तसेच दिवाळखोरीशी संबंधित सर्व निर्णय त्यांच्या देखरेखीखाली घेतले जाणार आहेत.
RBI च्या म्हणण्यानुसार, बँकेच्या कामकाजामुळे ठेवीदारांच्या हिताला धोका निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे Paytm Payments Bank ची लिक्विडेशन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे Paytm अॅप वापरणाऱ्या सर्व ग्राहकांवर थेट परिणाम होईलच असे नाही. मात्र, पेटीएम पेमेंट बॅंकशी संबंधित खाती, ठेवी किंवा बँकिंग सेवा वापरणाऱ्या ग्राहकांनी RBI आणि अधिकृत लिक्विडेटरकडून जारी होणाऱ्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. देशभरातील लाखो ग्राहकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!