Edition

ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करण्यासाठी वैजीनाथ धेडे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामपंचायतच्या मासिक सभेला ग्रामस्थांना उपस्थित राहण्याची परवानगी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोलापूर (विशेष प्रतिनिधी):
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राहावे यासाठी कातेवाडी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ औदुंबर धेडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर सर्वसामान्य नागरिक व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग सभेत उपस्थित राहण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, वैजीनाथ धेडे यांनी १६ सप्टेंबर २०२३ रोजी पहिल्यांदा ग्रामपंचायत कार्यालयाकडे मासिक सभेला उपस्थित राहण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी ०५ जून २०२६ रोजी गट विकास अधिकारी (मोहोळ) आणि ग्रामसेवकांना स्मरणपत्र पाठवून ‘मुंबई ग्रामपंचायत (सभाबाबत) नियम १९५९’ व शासकीय परिपत्रकांचा हवाला दिला होता. तसेच २५ जुलै २०२६ रोजी दिलेल्या पत्रात सभेची नोटीस किमान ७ दिवस आधी फलकावर लावणे आणि ग्रामस्थांना बसण्याची योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली होती.
​या पाठपुराव्याची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालय कातेवाडी यांनी २८ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून ग्रामस्थांना मासिक सभेत उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
​प्रशासनाने दिलेल्या पत्रातील प्रमुख बाबी:
​मासिक मीटिंग सभेस उपस्थिती: अर्जदारासह सर्वसामान्य ग्रामस्थांना मासिक मीटिंग सभेस उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
​सभेची सूचना: सभेची नोटीस ३ दिवस आधी ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल.
​ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग सभा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली झाल्यामुळे गावातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
​⚡ “गावाचा पैसा कुठे आणि कसा खर्च होतो हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक गावकऱ्याला आहे. या निर्णयामुळे कातेवाडीत आता मनमानी कारभाराला चाप बसेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत होईल!”
— वैजीनाथ धेडे (सामाजिक कार्यकर्ते, कातेवाडी, ता. मोहोळ)

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!