Edition

उंचगावात ज्येष्ठ नागरिकांना काठीरुपी छत्रीचा आधार; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे,

समाजसेवेचे व्रत घेतलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाटचाल ही हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या तत्त्वावरच चालू आहे. आज समाजात बघितलं तर आपल्या देशाच भविष्य म्हणून आपण युवा पिढीकडे बघतो पण आज पाहिलं तर देशामध्ये पेपर फुटी सारखे प्रकार घडत आहेत पण त्याला उत्तर म्हणून युवा पिढीने एक अन्यायाविरुद्धचा लढा उभा केला आहे त्याला सर्वांनी मिळून पाठिंबा देऊन पेपर फुटी सारख्या प्रकाराचा ज्येष्ठ नागरिकांनी निषेध नोंदवावा असे आव्हान शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव (उद्धव ठाकरे पक्ष) यांनी केले.

यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट म्हणाले की, करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने गेली बारा वर्ष छत्री वाटपाचा हा उपक्रम घेतला जात आहे. ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा एक कणा असतात व त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच असते असेही प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी उंचगाव परिसरातील १२० जेष्ठ नागरिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उंचगावचे उपसरपंच अरविंद शिंदे, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, अमर जाधव अजित चव्हाण शेंडगे सर तसेच प्रियदर्शनी कॉलनी परिसर व जानकी नगर परिसर या भागातील ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!