
जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव
रिसोड : तालुक्यातील दापुरी खुर्द परिसरात अलीकडे झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी तणनाशक फवारणीला वेग दिला आहे. संतोष वामन भालेराव यांच्या शेतात सोयाबीन पिकावर तणनाशक फवारणी करण्यात येत असून, परिसरातील शेतकरीही या कामात व्यस्त आहेत. पावसामुळे तणांची वाढ झाल्याने वेळेत तणनियंत्रण करणे आवश्यक ठरत असून, यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











