Edition

सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला अवि भाऊ कांबळे यांचा वाढदिवस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी
उदय साळुंखे

उंचगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उंचगाव ता. करवीर येथील युवा नेते अवि भाऊ कांबळे यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला.

यानिमित्त कुमार व कन्या विद्या मंदिर, उंचगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याशिवाय गरजू व गोरगरीब नागरिकांसाठी कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना मोफत भोजनाचा लाभ मिळाला.

यानंतर कोल्हापूर रेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. उत्तम दादा कांबळे यांच्या हस्ते केक कापून अवि भाऊ कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजसेवा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंना मदतीचा हात देण्याचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी आयटी सेल कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर कांबळे,वसगडेगावचे युवा नेते गजेंद्र कांबळे,युवा करवीर उपाध्यक्ष संतोष कांबळे,सुमित तराळ,तुषार सावंत ,नितीन कांबळे श्रीकांत मालेकर

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!