Edition

दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरू 20% प्रोटोकॉलचा अभिषेक मुळे यंत्रणा ठप्प दंडात्मक कारवाईची नागरिकाची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – नगरपरिषदेने नवीन टेंडर रत्नप्रभा या कंपनीला देऊन दोन दिवस झाले तरी त्यांचे काम सुरू झाले नाही कामगारांना किमान वेतन आयोग व गावातील कामगारांना काम मिळावे गेली दहा वर्ष ही कामगार घनकचरा व्यवस्थापनाचे काम करत असून कोरोनाच्या काळात त्यांनी केलेली गावाची मदत ही विसरून आज कामगारांच्यावर उपासमारीची वेळ येत असल्याचा हा महत्त्वाचा मुद्दा कामगार वर्ग बोलून दाखवत आहे पण दोन दिवसापासून गावातील कचरा संकलन बंद आहे
कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा पण गावाला वेटीस धरून जर गटर,साफसफाई,कचरा संकलन नाही झाले तर याला दोषी कोन ठेकेदार की नगरपरिषद की ज्या नगरसेवकांच्या हाट्टापायी चालू असलेला हा खटाटोप मुख्याधिकारी यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी दिवसाखेरीज त्या ठेकेदारास दंड करून त्याला रोज एक नोटीस लागु करुन तात्काळ दंड आकारावा तीन नोटीसीनंतर त्याला काळ्या यादीत घालावी अशी मागणी गावकरी करत आहेत
गावातील कामगारांना न्याय मिळावा 20% प्रोटोकॉलचा अभिषेक याची चौकशी झाली पाहिजे ठेकेदाराने कुणाच्या म्हणण्याने अभिषेक घातला त्याचीही चौकशी झाली पाहिजे असे गावातील राजकीय नेते मंडळी मागणी करत असून कामगार संघटना एकजूट होऊन बाहेरील आलेल्या कामगारांना काम करण्यास तीव्र विरोध करत आहेत
आज सकाळी ठेकेदार यांनी बाहेरील कामगार आणून कामास सुरुवात करीत असताना हुपरीचे कामगार व बाहेरील कामगार यांचा जोरदार वाद झाला त्यामुळे ते आलेले कामगार रिकाम्या हाताने परत गेले या विषयावर तात्काळ तोडगा काढावा व रत्नप्रभा या कंपनीस दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे हा विषय आज संपवणे गरजेचे असून बुधवार बाजार असल्याने संध्याकाळी साफसफाई साठी मोठी अडचण होऊन बसेल अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशी मागणी कामगार संघटनेकडून जोर धरत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!