Edition

टाळ-मृदंगाच्या गजरात शिराळ्याची मानाची गोरक्षनाथ दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ; माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक कुटुंबीयांकडून वारकऱ्यांचे औक्षण.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा /प्रतिनिधी -:
​          आषाढी वारीनिमित्त शिराळा गोरक्षनाथ मंदिरातून धनगरी ढोल, टाळ-मृदंग आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ “माय जगन्नाथ बाप जगन्नाथ “यांच्या नामघोषात दिंडीची सुरुवात होऊन दरवर्षीप्रमाणे पंढरपूरसाठी मोठया उत्साहात प्रस्थान  झाले. तर हरीनामाच्या तालावर वयोवृद्ध महिला, पुरुष आणि सर्व वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागीहोते.
दिंडी शिराळा मार्गे येत असताना  माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या निवासस्थानाजवळ आगमन होत असताना नाईक कुटुंबीयांकडून दुपारपासूनच स्वागताची जय्यत तयारी करत दिंडी मार्गावर स्वागतासाठी भव्य व आकर्षक रांगोळी टाकण्यात आले यावेळी नाईक कुटुंबातील महिलांकडून दिंडीतील सर्व वारकऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून विणाधारी वारकरी, तुळस घेतलेल्या महिला आणि गोरक्षनाथ पालखीला पुष्पहार अर्पण करून  स्वागत केले. तर ​शिवाजीराव नाईक यांच्याकडून दिंडीतील वारकऱ्यांची आस्थेने विचारपूस  केली. अनेक वारकर्यांनी “उभ्या जन्मात विठ्ठल वारी चुकायची नाही” असे उदगार काढले.

यावेळी सत्यजित नाईक, सौं सुनंदा नाईक,सौ. देवयानी नाईक, अरुण पाटील, पद्मावती पाटील,नाईक कुटुंबीयांसह , बजरंग कदम, सागर कदम, सीमा कदम, प्रदीप कदम , गोरख पवार, भरत कांबळे, मोहन पाटील, बाबासो परीट, संदीप कांबळे,पोपट पटेकरी, सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


​      फोटो ओळ: शिराळा येथे आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या गोरक्षनाथ दिंडी सोहळ्याचे निवासस्थानाजवळ स्वागत करताना माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक, सौ. सुनंदा नाईक, सत्यजित नाईक व नाईक कुटुंबीय

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!