
डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि. 06 जुलै सेलू येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वतीने सहकार सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साईबाबा नागरी सहकारी बँक चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने साहेब, तुळजाभवानी अर्बन चे विभागीय अधिकारी शिंगणे सर हे होते. कार्यक्रमासाठी यशवंत नागरी सहकारी पतसंस्था चे शाखाधिकारी विवेक सोननेकर, CEO सेलू नागरी पतसंस्था , दीपक कदम सर माउली अर्बन बँक,श्याम मेहकर सर, ओम प्रकाश देवडा पिपल को-ऑपरेटिव बँक हिंगोली, पत्रकार डॉ शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने सुरुवात झाली. शाखेचे शाखाधिकारी श्री सागर जोशी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच पुष्पगुच्छ देऊन शाखेतर्फे प्रमुख अतिथिंचे स्वागत केले. रामराव लाडाने, शिंगणे सर, डॉ शिवाजी शिंदे या प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगतात सहकाराची गरज व्याप्ती व महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. शाखेचे शाखाधिकारी श्री सागर जोशी यांनी देवगिरी बँकेस नुकतेच मिळालेले पुरस्कार व बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये केलेला एकूण व्यवसायाचा तसेच बँकेने सुरू केलेली इंटरनेट बँकिंग सुविधा यामध्ये ग्राहकांचे मोलाचे योगदान व बँकेचा प्रगतीचा आलेख विशद केला व बँके विषयी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी विविध सहकारी सोसायट्या व पतसंस्थांचे प्रतिनिधी व ग्राहक यांची उपस्थिती होती. शाखेचे रोखपाल उमेश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.











