Edition

वारणा दुथडी भरून वाहू लागली; चिकुर्डे बंधारा पाण्याखाली, ड्रोनमधून टिपले नयनरम्य दृश्य..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने परिसरात निसर्गसौंदर्य खुलून आले आहे. चांदोली धरणातून विसर्ग सुरू असल्याने तसेच वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी नदीवरील हा छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
वारणा नदीचे विस्तीर्ण पात्र, वेगाने वाहणारा प्रवाह आणि पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि पर्यटकांची गर्दी होत आहे. विशेषतः ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्ये अत्यंत आकर्षक असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
चिकुर्डे येथील युवा छायाचित्रकार शुभम माने यांनी ड्रोनच्या सहाय्याने ही मनमोहक दृश्ये टिपली आहेत. त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या या दृश्यांमधून वारणा नदीचे रौद्र आणि तितकेच मोहक रूप पाहायला मिळत असून निसर्गप्रेमींकडून या चित्रफितीचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, नदीपात्रात पाण्याचा वेग वाढल्याने नागरिकांनी आणि पर्यटकांनी बंधाऱ्यावर किंवा नदीकाठी अनावश्यक गर्दी न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!