Edition

सोना आई इंग्लिश स्कूल मध्ये मुलींच्या सुरक्षित तेवर कार्यशाळा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
भेकराईनगर येथील सोना आई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मुलींच्या सुरक्षिततेवर कार्यशाळा घेण्यात आले होते पापडे वस्ती येथे फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या सुरक्षितते संदर्भात विशेष जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली दामिनी फुरसुंगी मार्शल मनीषा साळवे व पल्लवी गुंगले यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. इयत्ता ९ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा, विद्यार्थी सुरक्षा, गुड टच बॅड टच, सुरक्षित व असुरक्षित वर्तन, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, पौष्टिक आहार, आत्मविश्वास वाढवणे तसेच सोशल मीडियाचे अतिवापराचे दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली, यावेळी POCSO Act 2012, महिला व बालकांसाठी हेल्पलाइन क्र. १०९१, ११२, १०९८ तसेच सायबर सुरक्षा हेल्पलाइन १०३० यांची माहिती देण्यात आली, यावेळी शाळेचे प्राचार्य ए एल नरसिंग राव, सुवर्णा राव, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बनकर, सोनिया राव, राज लक्ष्मण राव, मनोहर बाबु रेड्डी, सोनिया मोरे, संदेश मोरे, आदि उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!