Edition

कृषीदूतांकडून बोर्डो मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक व जनजागृती.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील कृषीदूत विद्यार्थ्यांनी ढेंगळी पिंपळगाव येथे शेतकऱ्यांसाठी बोर्डो मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक आयोजित केले. या प्रात्यक्षिकामध्ये बोर्डो मिश्रण तयार करण्याची योग्य पद्धत, आवश्यक साहित्य, योग्य प्रमाण व सुरक्षित वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थ्यांनी कॉपर सल्फेट, चुना व पाण्याचा वापर करून बोर्डो मिश्रण तयार करून दाखविले. हे मिश्रण द्राक्ष, आंबा, डाळिंब, लिंबूवर्गीय फळपिके तसेच विविध भाजीपाला पिकांवरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी असल्याचे सांगण्यात आले. बोर्डो मिश्रणामुळे करपा, डाग, अँथ्रॅक्नोज व इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. योग्य प्रमाणात व योग्य वेळी फवारणी केल्यास पिकांचे संरक्षण होऊन उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण सुधारण्यास मदत होते.या उपक्रमास प्राचार्या डॉ. ए. ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एन. चव्हाण व कार्यक्रमाधिकारी डॉ. ए. एस. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषीदूत, संकेत कुंडकर, अभय कावरखे,  राज लोया, कृष्णा राठोड, के. श्रीनू हे उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!