Edition

वारणा नदीच्या पुरामुळे मांगले–सावर्डे बंधाऱ्यावरून पाणी; वाहतूक बंद, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यांना जोडणारा मांगले–सावर्डे कोल्हापुरी पद्धतीचा (KP) बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मांगले–सावर्डे बंधारा हा वारणा नदीवरील महत्त्वाचा सिंचन बंधारा असून परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील नागरिकांच्या दळणवळणासाठी हा प्रमुख मार्ग आहे. मात्र, नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे सध्या बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे धोकादायक बनली आहे.
वारणा नदीवरील इतर अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांवरूनही पाणी वाहत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पाण्यातून बंधारे अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!