Edition

प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार धैर्यशील माने पाठपुरावा करत आहेत – सौ. वेदांतिका माने.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा / प्रतिनिधी
शिराळा आणि शाहुवाडी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे सौ. वेदांतिका माने यांनी प्रकल्पग्रस्त आंदोलकांना सांगितले.

मनदुर ता. शिराळा येथे गेली ११२ दिवस सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सौ. वेदांतिका माने म्हणाल्या, प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्त नागरिकांच्या मागण्यांसाठी उन्हाळी अधिवेशनामध्ये खासदार धैर्यशील माने यांनी खास बाब म्हणून मुद्दा उपस्थित करून प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. धोरणात्मक बाब असल्यामुळे निर्णय प्रक्रिया थोडीशी प्रलंबित राहिली आहे. मात्र लवकरच प्रकल्पग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठी केंद्र व राज्य सरकार समन्वयातून प्रयत्न करीत आहे. वनविभाग, पाटबंधारे विभाग यांची मदत घेऊन सरकार लवकरच येथील नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी घडवून आणेल.

दरम्यान सौ. वेदांतिका माने यांनी सुमारे तासभर येथील महिला व पुरुष आंदोलकांशी हितगुज साधले. त्यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक अडीअडचणी जाणून घेतल्या. नजीकच्या काळात त्यावरती शासनाच्या माध्यमातून उपाय योजना करणार असल्याचे त्यांना सांगितले.

*फोटो ओळ – मनदुर ता. शिराळा येथे गेली ११२ दिवस सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी सौ. वेदांतिका माने यांनी भेट दिली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!