Edition

सेलू उपजिल्हा रुग्णालयाची पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी, सेलू : राष्ट्रीय प्लस पोलियो लसीकरण दिनानिमित्त आज दि २८ जून रोजी सम्पूर्ण शहरात पल्स लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली .या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी 10 वाजता सेलू येथील उप जिल्हारुग्णालयात संपन्न झाला. यावेळी सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत ,उप जिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजय हरबडे , डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ ऋतुराज साडेगावकर यांच्यासह शहरातील डॉ विलास मोरे ,दिलीप डासाळकर,संजय मुंढे , रामकीशन कटारे ,अबरार बेग आदी पत्रकार बांधव तसेच उपजिल्हा रुग्णालतातील कर्मचारी उपस्थित होते .
शहरात एकूण २९ लसीकरण केंद्रावर तसेच २ फिरत्या पथकाद्वारे ही मोहीम राबवली जात आहे . यामध्ये 0 ते ५ वयोगटातील 7300 च्या पुढे लाभार्थ्यांना या मोहिमेत पल्स पोलियोचे लसीकरण होणे अपेक्षित आहे.यासाठी एकूण ५ पर्यवेक्षक ८२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २ वाहने देखील फिरत्या पथकासाठी ठेवण्यात आली आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या ० ते ५ वयोगटातील बालकांना ही लस पाजून घ्यावी .असे आवाहन डॉ संजय हरबडे यांनी केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!