Edition

सीमाकवी रवींद्र पाटील यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने’ सन्मानित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर:प्रतिनिधी
उदय साळुंखे, कोल्हापूर दसरा चौक येथे १५२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित पहिल्या अखिल भारतीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे’*मध्ये शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सीमाकवी रवींद्र मारुती पाटील (बेळगाव) यांना प्रतिष्ठेचा ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

मोहमेडन एज्युकेशन सोसायटी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. शंकर अंदानी (अहिल्यानगर) होते. पद्मश्री उदय देशपांडे व माजी सभापती अक्काताई नलवडे यांच्या हस्ते रवींद्र पाटील यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या साहित्य संवाद परिषदेचे उद्घाटक म्हणूनही त्यांनी उपस्थिती लावली.

सीमाकवी, पत्रकार, तंत्रस्नेही शिक्षक, गीतकार, समालोचक, निवेदक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी बहुआयामी ओळख असलेले रवींद्र पाटील हे बेळगाव सीमाभागातील कुद्रेमानी गावचे सुपुत्र असून, राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि सीमाप्रश्नांवरील त्यांच्या कार्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या लेखणीतून ‘अखंड महाराष्ट्राचा लढा’ हे सीमावासियांच्या व्यथा मांडणारे गीत साकार झाले असून, ‘सीमालढा’ हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटकचे राज्याध्यक्ष म्हणून त्यांनी बेळगाव येथे सलग सात वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले आहे. तसेच बडोदा, दिल्ली आणि विविध अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये कवी म्हणून सहभाग नोंदवून सीमाभागातील मराठी साहित्याचा आवाज राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला आहे.

शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना १० हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सीमाभाग, शिक्षक, साहित्यिक, पत्रकार व विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!