Edition

गडमुडशिंगी शाहूनगर वार्ड क्र. ३ मध्ये पोलिओ डोस अभियान चालू.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी,- शासनाच्या राष्ट्रीय पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत आज, रविवार दि. २८ जून २०२६ रोजी गडमुडशिंगी ता. करवीर शाहूनगर येथे वार्ड क्र. ३ येथे बालकांना पोलिओचा डोस देण्यात येत आहे. या अभियानाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे काम सुरू आहे.

यावेळी अंगणवाडी सेविका नंदा सोनुले, मदतनीस पूजा माने यांच्यासह डेप्युटी सरपंच गुंडा वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन माने, अमित वायदंडे, महादेव वायदंडे, पत्रकार विशाल फुले, रवी श्रीसागर, पिंटू मस्के तसेच नर्सिंगचे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी श्रुती मस्के उपस्थित होत्या. उपस्थितांनी प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देऊन पोलिओमुक्त भारत घडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक महिला वर्ग उपस्थित होत्या.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!