मलिकवाड प्रतिनिधी अमर माने, सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार व आर के फाउंडेशनचे संस्थापक अण्णासाहेब कदम यांचे चिरंजीव अभिषेक यांचा विवाह बोरगाव येथील युवा उद्योजक ओंकार दादासाहेब भादुले यांची बहीण ची. सौ. का. दर्शना त्यांच्याशी काल सदलगा शहरातील ओम मल्टीपर्पज हॉल येथे मोठ्या उत्साहात व शाही थाटात अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या लग्न सोहळ्यासाठी चिकोडी सदलगा विधानसभा मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार माननीय गणेश अण्णा हुक्केरी, माजी खासदार चिकोडी लोकसभा मतदारसंघ आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब ज्वल्ले , सदलगा शहराचे नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, नगरसेवक संतोष नवले उदय पाटील प्रकाश अनुरे, लताताई पाटील, राजू अमृतसंम्मानावर, हालशिद्दनाथ फॅक्टरीचे संचालक शरद जगंटे, दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुण कुमारजी देसाई, शहरातील सुप्रसिद्ध वकील रमेश देसाई, देववाडीचे माजी डेप्युटी सरपंच शिवाजीराव नांगरे पाटील, बेडकिहाळ येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे, श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकळीवाडी चे संचालक बाळासाहेब पाटील, चिकोडीचे नगरसेवक अनिल माने, शिरोळ तालुका बी जे पी किसान मोर्चा अध्यक्ष राजू पाटील, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, सकाळचे वृत्तसंपादक तानाजी पवार, वृत्त निवेदिका संध्या गावडे, पूजा पाटील, शिरोळ तालुका, निपाणी तालुका व चिकोडी तालुक्यातील पत्रकार मंडळी, शासकीय कार्यालयाचे कर्मचारी,अधिकारी व अनेक नागरिक बंधू-भगिनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
े











