Edition

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खोतवाडी वृत्तसेवा – शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था,रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरवात छ.राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सागर चुडाप्पा सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर यांनी छ.राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवना विषयी त्यांच्या शिक्षणातील योगदाना विषयी व सामाजिक कार्याविषयी माहिती सांगितली.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सागर चुडाप्पा सर यांनी आपल्या मनोगतातुन शाहू महाराजांचे विचार सांगितले. तसेच आजच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले
या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील सौ.चौगुले ए.ए.मॅडम, श्री.दुकाने आर.एस.,श्री.एन.ए.सुतार तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर, कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.समाजे सी.बी.यांनी केले तर आभार श्री.कांबळे एस.एम. यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!