Edition

शासकीय जागेवरील पाटामुळे पिण्याच्या पाण्याचे बोअरवेल व घरकूल धोक्यात; कारवाईची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव, वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथील रहिवासी संतोष वामन भालेराव यांनी ई-क्लास शासकीय जागेवरील कथित अतिक्रमण, पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण तसेच घरकुल परिसराला निर्माण झालेल्या धोक्याबाबत संबधीत अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, शासनाच्या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या मागील बाजूस असलेल्या ई-क्लास शासकीय जागेमध्ये जेसीबीच्या सहाय्याने अंदाजे सात फूट खोल व पाच फूट रुंद पाट खोदण्यात आला होता. या कामामुळे संतोष भालेराव यांनी लावलेल्या चार आंब्यांच्या झाडाचे नुकसान झाल्याचा तसेच पावसाळ्यात पाटातील घान पाणी घरकुल परिसरात शिरून व पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल मध्ये शिरूर पाणि दुषित होऊन लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या बोअरवेलचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर पाटालगत सर्व व्यक्तींनी शौचालये उभारून त्यांचे सांडपाणी पाटात सोडल्याने दूषित पाणी पिण्याच्या बोअरवेलमध्ये झिरपत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन भालेराव कुटुंबाच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
याप्रकरणी संबंधित शासकीय जागेची मोजणी करून अतिक्रमणाची चौकशी करावी, खोदलेला पाट तात्काळ बुजवावा, पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवून बद्रीनाथ पांडूरंग लोखांडे यांच्यावर महसूल नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी अर्जदार संतोष भालेराव यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणाची महसूल प्रशासनाकडून चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा संतोष भालेराव व परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!