Edition

यड्राव येथे जखमी नाग सापावर यशस्वी शस्त्रक्रिया ; उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव (प्रतिनिधी )
यड्राव ता.शिरोळ येथे गंभीर जखमी झालेल्या नाग सापावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक चौडे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले. उपचारानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
येथील शेतकरी विनोद पाटील यांच्या शेतात काम सुरू असताना नाग साप आढळून आला. साप दिसताच परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच सर्पमित्र फिरोज अपराध घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणतीही इजा न होता नाग सापाला काळजीपूर्वक पकडून बाहेर काढले.
मात्र सापाची तपासणी करताना त्याच्या पोटावर मोठी जखम असल्याचे निदर्शनास आले. जखमेमुळे त्याची आतडी बाहेर आली होती आणि साप गंभीर अवस्थेत होता. त्यानंतर सापाला तातडीने डॉ. दीपक चौडे यांनी नाग सापावर शस्त्रक्रिया करून प्राथमिक उपचार केले. जखमेची स्वच्छता करून सापाच्या पोटाला चार टाके घालण्यात आले. तसेच आवश्यक औषधोपचारही करण्यात आले. उपचारानंतर सापाची प्रकृती स्थिर झाल्याने त्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या कार्याबद्दल सर्पमित्र फिरोज अपराधी व डॉ. दीपक चौडे यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. वन्यजीव संरक्षणासाठी अशा प्रकारचे संवेदनशील कार्य प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!