Edition

कन्या विद्या मंदिर तारदाळ येथे इयत्ता ८ वी वर्गास मंजुरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत जिल्हा परिषदेचा निर्णय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तारदाळ प्रतिनिधी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या विद्या मंदिर तारदाळ, ता. हातकणंगले येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ८ वीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांनी सादर केलेल्या प्रस्तावास तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जैस्मिन (भाप्रसे) यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. मंजुरीनुसार कन्या विद्या मंदिर तारदाळ शाळेत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ८ वीचा वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आवश्यक भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच वर्गखोल्यांची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची राहील. नव्याने मंजूर झालेल्या वर्गासाठी विहित निकषानुसार आवश्यक पटसंख्या असल्याची खात्री करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती हातकणंगले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या निर्णयामुळे तारदाळ परिसरातील विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागणार नसून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार असल्याची भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

1 thought on “कन्या विद्या मंदिर तारदाळ येथे इयत्ता ८ वी वर्गास मंजुरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत जिल्हा परिषदेचा निर्णय”

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!