Edition

श्रमदान मारुती मंडळाच्या ‘भव्य वाचन स्पर्धेचा’ बक्षीस वितरण सोहळा संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग
नगरसेवक नामदेव माळवदे आणि राजेंद्र काकडे यांच्याकडून ‘पूर्व पुण्यातील आदर्श मंडळ’ म्हणून गौरव

श्रमदान मारुती मंडळ, पुणे अंतर्गत असलेल्या श्रमदान ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘भव्य वाचन स्पर्धेचा’ बक्षीस वितरण समारंभ १४ जून २०२६ रोजी १००, महात्मा फुले पेठ येथे उत्साहात संपन्न झाला. स्पर्धेचे हे यशस्वी ८ वे वर्ष असून, मंडळाच्या माननीय अध्यक्षांच्या राजेंद्र कोंढारे यांचे मार्गदर्शनाने व प्रेरणेने ही अभिनव संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक नामदेव माळवदे आणि राजेंद्र काकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करत, “श्रमदान मारुती मंडळ हे पूर्व पुण्यातील एक ‘आदर्श मंडळ’ आहे,” अशा शब्दांत गौरव केला व भविष्यातील उपक्रमांसाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.
स्पर्धेचे प्रायोजक आणि विजेते बालवाचक:
सायकल (प्रायोजक: उद्योजक प्रसाद भिमाले) – अर्जुन भालगारे
स्मार्ट वॉच (प्रायोजक: शिवसह्याद्री चॅरिटेबल फौंडेशन) – निर्वेद गायकवाड, आर्यन पवार, प्रियांश टक्कर,
स्टडी टेबल (प्रायोजक: शिरीष बोजा) – चित्रा गाडेकर, सावी भागणे, श्रेयश मलपेद्दी,
स्कूल बॅग (प्रायोजक: मोहनीश सावंत) व कंपास (उत्तेजनार्थ) चे देखील वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
नियोजन व सहकार्य:
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिरीष बोजा, अजय कोंढारे, अनिल कुडले, मोहनीश सावंत, राहुल आवटे, शेखर पुजारी आणि ग्रंथपाल अथर्व कोळवण, सुवर्णा कोंढारे, दीपाली गायकवाड यांचे मोलाचे नियोजन लाभले.
सिद्धेश्वर पेंटर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला परिसरातील पालक आणि बालवाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!