Edition

खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे नविन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खोतवाडी प्रतिनिधी – शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.

यावेळी नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना पुस्तके, शालेय साहित्य,गुलाबाचे फुल देवुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर आपल्या मनोगतातुन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे महत्व सांगुन शुभेच्छा दिल्या.

तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सागर चुडाप्पा यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनींना शुभेच्छा देवुन नविन विद्यार्थी- विद्यार्थीनींना आपल्या शाळेची वैशिष्ट्ये सांगितली.

या वेळी सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.एस.के.हेमगिरे यांनी केले.तर आभार श्री. मगदुम एस.बी.यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

1 thought on “खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे नविन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.”

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!