यड्राव ( प्रतिनिधी ) : यड्राव (ता. शिरोळ ) येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत ग्रामपंचायतीच्या छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात पार पडली. सन २०२० सालच्या लोकसंख्येच्या आधारे सन २०२६ सालच्या ग्रामपंचायत प्रभाग सहा नुसार १७ जागेसाठी विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत जाहिर करण्यात आले. सदर आरक्षण सोडत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरढोण मंडल अधिकारी मच्छिंद्र कुंभार व तलाठी गणेश आवळे यांनी जाहिर केले. ग्रामपंचायत प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे – : प्रभाग क्रं. १ मध्ये — सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरुष व अनु.जाती पुरुष. प्रभाग क्रं. २ मध्ये — नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण स्त्री. प्रभाग क्रं. ३ मध्ये — अनु. जाती स्त्री, नागरीकांचा मागास प्रवर्ग पुरुष, व सर्वसाधारण स्त्री. प्रभाग क्रं. ४ मध्ये — नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री, व सर्वसाधारण स्त्री. प्रभाग क्रं. ५ मध्ये — नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री, व सर्वसाधारण पुरुष. प्रभाग क्रं. ६ मध्ये — सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरुष, व सर्वसाधारण पुरुष असे सन २०२६ सालासाठी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सहा प्रभागानुसार आरक्षण जाहिर झाले. यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक – निबांळकर, ग्रा. प. सद्स्य रंगराव कांबळे, सारंग काकडे, माजी उपसरपंच विजय पाटील, नितीन कांबळे, अक्षय भोसले, राहूल पोवार, अभिजीत प्रभावळकर, राहूल दावाडे, प्रमोद कांबळे, नितीन बिरांजे, निशांत शिंदे, रविंद्र भोसले, ग्रा.प. कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर यांनी आभार मानले. 











