Edition

कुरळपमध्ये शक्तिपीठ महामार्गाविरोधात सहकारी संस्थांचा एकमुखी ठराव; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें


सांगली जिल्हा प्रतिनिधी – शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गाला विरोध दर्शवत कुरळप गावातील दोन सहकारी सोसायट्या, दोन पाणीपुरवठा संस्था आणि दोन दूध संस्थांच्या चेअरमन व संचालक मंडळाची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात यावा, असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, गावातील सर्व सहकारी संस्थांनी एकमताने महामार्गाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. “शक्तिपीठ मार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही तयार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पाटील यांनी सांगितले की, या आंदोलनात महिलाही सक्रियपणे सहभागी होणार असून त्या शेतकरी आणि ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहतील. तसेच भविष्यात जमिनीची मोजणी, ड्रोन सर्वेक्षण किंवा इतर कोणत्याही प्रशासकीय प्रक्रियेसाठी अधिकारी आले, तर त्यास संघटितपणे विरोध केला जाईल, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीत उपस्थित सर्व चेअरमन, संचालक मंडळाचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याची भूमिका घेतली असून, यापुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठीही एकजूट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!