Edition

शिंगणापूर येथे दुर्दैवी घटना; नदीत बुडालेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह दोन तासांच्या शोध मोहीमेनंतर सापडला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी – मौजे शिंगणापूर येथे नदीत पोहत असताना बुडालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानस गणेश कांबळे (वय ६) हा गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या वडिलांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी तो पाण्यात बुडाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पथकाने नदी परिसरात शोधमोहीम सुरू करून सलग दोन तास अथक प्रयत्न केले. अखेर मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
या बचाव व शोध मोहिमेत कृष्णात सोरटे, शैलेश हांडे, प्रीतम केसरकर, प्रथमेश येरुडकर, आदिनाथ कांबळे, अविराज बलुगडे, शुभम म्हाडगूत, सुदेश चव्हाण, अविनाश चरापले तसेच कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी मोलाची कामगिरी बजावली.
या घटनेमुळे शिंगणापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!