Edition

अथणी पोलिसांच्या कथित मारहाणीविरोधात रायबाग वकील संघटनेचे आंदोलन; दोषींवर कारवाईची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रायबाग प्रतिनिधी : अथणी येथील पीएसआय उप्पार व पोलीस हवालदार मल्लिकार्जुन कोरी यांनी वकिलांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करत रायबाग वकील संघटनेच्या सदस्यांनी बुधवारी तीव्र निषेध नोंदविला. यावेळी ग्रेड-२ तहसीलदार डी.एस. जमादार यांना निवेदन देऊन संबंधित पोलिसांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ शहरातील झेडा बांध परिसरात वकिलांनी आंदोलन केले. त्यानंतर बार असोसिएशनचे अध्यक्ष के.आर. कोतीवाले यांनी माध्यमांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला. अथणीचे पीएसआय उप्पार व हवालदार मल्लिकार्जुन कोरी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा वकील संघटनेतर्फे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलनात आर.एच. गोंडे, टी.के. शिंदे, आर.ए. गेनेनवर, ए.एम. गेज्जे, एम.एम. होसामणी, सूरज पाटील, आर.एस. हळेप्पागोळ, व्ही.बी. बंडगार, ए.के. भजंत्री, व्ही.के. कुलकर्णी, निकिता कांबळे, एम.एम. पोथदार, एस.बी. शिरगोंडे यांच्यासह रायबाग वकील संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते. आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!