Edition

शक्तिपीठ महामार्गरूपी रावणाचे घोगाव, कुंडल व नागेवाडीत दहन! खासदार राजू शेट्टी आणि अॅड. दीपक लाड यांची उपस्थिती; महामार्गाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होत असून, विजयादशमी दसऱ्याच्या निमित्ताने घोगाव, कुंडल आणि नागेवाडी येथे शक्तिपीठ महामार्गाचे प्रतीकात्मक रावणदहन करण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, पलूस-कडेगाव-खानापूर यांच्या वतीने आयोजित या आंदोलनाला खासदार राजू शेट्टी आणि अॅड. दीपक लाड यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
‘शेतकऱ्यांच्या एक इंचही जमिनीला धक्का लागू देणार नाही!’ असा निर्धार व्यक्त करत मागील सहा महिन्यांपासून या महामार्गाला आक्रमकपणे विरोध केला जात आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी येणाऱ्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा खासदार राजू शेट्टी आणि अॅड. दीपक लाड यांनी यावेळी दिला.

घोगाव येथे शक्तिपीठ महामार्गरूपी रावणाच्या प्रतिमेचे दहन पी. एस. बापू चव्हाण, हेमंत जाधव, किरण चव्हाण यांच्यासह बाधित शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुणाल पाटील, सचिन मगर, पांडुरंग गोरे, रामभाऊ जाधव, दीपक पाटील, धोंडीराम गोरे, पंडित कोळेकर, हनमंत मगर, दिनकर चव्हाण, बाबुराव निकम, सौरभ पाटील, प्रताप पाटील आणि दिलीप पाटील उपस्थित होते.

नागेवाडी येथे झालेल्या प्रतीकात्मक रावणदहन कार्यक्रमाला नागेवाडीसह भाग्यनगर, माहुली, हिंगणगादे आणि घानवड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संभाजी निकम, मनोज निकम, अक्षय सूर्यवंशी, राहुल निकम, सागर सुतार, संताजी जगताप, संतुबापू जगताप, संभाजी भोसले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
महामार्ग रद्द करण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार
शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी प्रतीकात्मक रावणदहन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होईपर्यंत आणि प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याचा निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार संघर्ष समिती आणि बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!