Edition

दारू पिण्यासाठी २०० रुपये न दिल्याने सुरीने हल्ला; विटेच्या मारहाणीत मित्रही जखमी किल्लेमच्छिंद्रगड येथील घटना; ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दारू पिण्यासाठी २०० रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर सुरीने हल्ला करून जखमी करण्यात आले, तर भांडण सोडविण्यास गेलेल्या त्याच्या मित्राच्या डोक्यात विट मारून त्यालाही जखमी केल्याची घटना किल्लेमच्छिंद्रगड येथे घडली. याप्रकरणी अभिजीत अशोक कदम (वय ३५, रा. किल्लेमच्छिंद्रगड) याच्याविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश तानाजी थोरात (वय ३५, व्यवसाय सेंट्रिंग, रा. किल्लेमच्छिंद्रगड) हे त्यांचे मित्र सुभाष धोंडीराम कदम आणि अमित धोंडीबा सुतार यांच्यासोबत १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजता जेवणासाठी जात होते. त्यावेळी पंचमनाथ महाराजांच्या मठाजवळ आरोपी अभिजीत कदम याने थोरात यांना अडवून, ‘लय मस्ती आली आहे का?’ असे म्हणत दारू पिण्यासाठी २०० रुपये मागितले.
थोरात यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्याने आरोपीने रागाच्या भरात त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर हातातील लहान लोखंडी पाते असलेल्या सुरीने हल्ला केला. हा वार हाताने अडविण्याचा प्रयत्न करताना थोरात यांच्या उजव्या हाताच्या तळव्याला जखम झाली.
दरम्यान, थोरात यांना सोडविण्यासाठी सुभाष कदम आणि अमित सुतार पुढे गेले. सुभाष कदम यांनी आरोपीच्या हातातील सुरी काढून घेतली. त्यानंतर आरोपीने खाली पडलेली वीट उचलून सुभाष कदम यांच्या डोक्यात मारल्याने तेही जखमी झाले.
या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), १८९(२), १९१(२) आणि १९१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.२० वाजता करण्यात आली. सुरुवातीचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील यांनी केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक घुले करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!