तारदाळ / प्रविण केर्ले
तारदाळ (ता. हातकणंगले ) : येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौंडचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. यानिमित्ताने ‘माता की जय’, ‘हिंदू राष्ट्र की जय’, ‘हिंदू धर्म की जय’ अशा घोषणांसह राष्ट्राभिमानी गीतांनी गावातील वातावरण चैतन्यमय झाले होते.
१९ ऑक्टोबरपासून या दुर्गामाता दौंडला उत्साहात प्रारंभ झाला होता. गावभाग, ज्ञानेश्वर नगर, बन्ने गल्ली जावळवाडी समर्थ नगर ठाकरे नगर कडमकाई डोंगर, शिराकाई कोडी मंदिर या भागांतून दौंड काढण्यात आली. या दौंडमध्ये भगवे फेटे, ध्वज अन् शस्त्रांसह धारकऱ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच, बारा बलुतेदारांच्या वेशभूषेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले.
गावातील प्रमुख मार्गावरून धारकऱ्यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांनी भगव्या ध्वजाचे औक्षण केले, तर रस्त्याच्या दुतर्फा आणि फुलांच्या पायघड्या घालून दौंडचे स्वागत करण्यात आले. बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींच्या पारंपरिक वेशभूषांसह जिवंत देखावे सादर करण्यात आले. मंडळाच्या ठिकाणी साकारलेल्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
गावातील विठ्ठल मंदिर पासून दुर्गामाता दौंडला प्रारंभ झाला शिरकाई मंदिर तारदाळ गाव वाघ बौद्ध समाज मंदिर चांदणी चौक दसरा चौक ज्ञानेश्वर नगर पासून छत्रपती शिवाजी चौकामध्ये सांगता करण्यात आली येथे जाऊन आरती करण्यात आली.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










