Edition

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस दुप्पट रक्कम व ६ महिने कारावासाची शिक्षा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. गौरव तराळ यांनी धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस धनादेशाच्या दुप्पट रक्कम, फिर्यादीस नुकसान भरपाई एका महिन्यात देण्याचे व ६ महिन्याच्या शिक्षेचा निर्णय दि. २१/१०/२०२६ रोजी सुनावला आहे.
घटनेची हकीकत अशी की, संजय जेमा राठोड रा. पाडी लंगे ता. सेलू जि. परभणी यांच्याकडून धनराज कन्स्ट्रक्शनचे मालक कैलास रामधन चव्हाण यांनी बांधकाम साहित्य पुरवठ्याबाबत १,५०,०००/- रुपयांचा माल घेतला होता. व त्या बदल्यात त्यांना धनादेश दिला होता.
संजय जेमा राठोड यांनी धनादेश बँकेत जमा केला असता खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश अनादर झाला. त्यामुळे संजय जेमा राठोड यांनी कैलास रामधन चव्हाण यांच्या विरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग सेलू येथे १३८ एन.आय. अॅक्ट अंतर्गत प्रकरण दाखल केले होते.उपरोक्त प्रकरणात वादीचा पुरावा व वादीच्या वकिलांच्या युक्तीवादावरून विद्यमान न्यायालयाने आरोपीस धनादेशाच्या दुप्पट रक्कम ३,००,०००/- रुपये १ महिन्यात फिर्यादीस नुकसान भरपाई द्यावी. व रक्कम न दिल्यास ३ महिन्याची साधी कारावासाची शिक्षा तसेच ६ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सेलूचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. गौरव तराळ यांनी सुनावली.
फिर्यादी संजय जेमा राठोड यांच्या वतीने अँड. एल. एच. खोना यांनी काम पाहिले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!