Edition

माणगावच्या स्वरा उपाध्ये हत्येच्या निषेधार्थ वळिवडेत कँडल मार्च! महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर | प्रतिनिधी : उदय साळुंखे

वळिवडे (ता. करवीर) येथे माणगावमधील १५ वर्षीय स्वरा नितीन उपाध्ये हिच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी कँडल मार्च काढण्यात आला. या निषेध मार्चमध्ये गावातील महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माणगाव (ता. हातकणंगले) येथे नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आरती करून घरी परतणाऱ्या स्वरा उपाध्ये या अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वळिवडे गावातून काढण्यात आलेला हा कँडल मार्च संपूर्ण गावातून फिरवण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर या मार्चची सांगता झाली. यावेळी स्वरा उपाध्ये हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या कँडल मार्चमध्ये सरपंच रूपाली कुसाळे, उपसरपंच वंदना जाधव, प्रिया खोत, मिणिषा हुल्ले, अपर्णा चौगुले, साक्षी चौगुले, रावसाहेब चौगुले, ग्रामपंचायत सदस्य कपिल घाटगे, प्रल्हाद शिरोटे, प्रा. सुरज चौगुले आणि सौरभ पोवार यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्वरा उपाध्ये हिच्या निर्घृण हत्येचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासन आणि पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मान्यवरांनी आपल्या भाषणातून केली.
जैन पंच कमिटी आणि वीर सेवा दलाच्या सहभागातून आयोजित या कँडल मार्चमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी समाजाने जागरूक राहून अन्यायाविरोधात एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. स्वरा उपाध्ये हिला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भावना व्यक्त करत उपस्थितांनी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण करावा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी आणि महिला व मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
फोटो :
स्वंरा उपाध्ये हिला श्रद्धांजली वाहताना वळिवडे गावातील महिला ,नागरिक ( छाया :विशाल फुले )

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!