Edition

गड-मुडशिंगी येथे फटाकेमुक्त दिवाळीसाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर प्रतिनिधी
दि. २२
उदय साळुंखे

न्यू इंग्लिश स्कूल, गड-मुडशिंगी येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी समितीचे सचिव प्रा. प्रशांत गोंधळी यांनी फटाक्यांमध्ये असणारे बेरियम, कॅडमियम सारखे विषारी रसायन आणि त्याचे मानवी आरोग्यावर होणारे घातक दुष्परिणाम याचे सविस्तर विश्लेषण करून विद्यार्थ्यांना माहिती दिली. फटाक्याच्या धुरामुळे दमा, डोळ्यांचे विकार आणि श्वसनाचे आजार कसे वाढतात हे त्यांनी पटवून दिले.

रिपब्लिकन पक्षाचे करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, “फटाक्यांवर उडवलेला हजारो रुपयांचा पैसा वाया घालवण्यापेक्षा तोच पैसा शालेय साहित्य, पुस्तके आणि शैक्षणिक सहलीसाठी वापरावा, हीच खरी दिवाळी.”

तर शाहीर अमोल कांबळे यांनी फटाक्याच्या मोठ्या आवाजाचा मानवी जीवनावर होणारा शारीरिक आणि मानसिक परिणाम यावर प्रभावी भाष्य केले.

या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पक्षाचे महासचिव अर्जुन कांबळे, शाखा प्रमुख संतोष कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले व विद्यार्थ्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिंदे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!