Edition

” हात मदतीचा” सामाजिक उपक्रम तुमच्या आमच्या सहकार्याने च के.बा विदयालयात उद्घाटन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

मागील 8 वर्षात 2793 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील वसंतराव खारकर सभागृहात
शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या संकल्पनेतून “हात मदतीचा” शालेय साहित्य वाटप सामाजिक उपक्रम तुमच्या आमच्या सहकार्याने चे उद्घाटन
गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झाले.दलित मित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती वर्षातील स्मृतिदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी कथामालाचे संस्थापक कै . दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतुन सुरु करण्यात आलेल्या हात मदतीचा या उपक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीरामजी भांगडिया व दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त पोलीस अधिकारी माधव लोकूलवार, ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे, मुख्याध्यापक संजय धारासुरकर,नगरसेविका शांताबाई रघुवंशी, संयोजक आपला माणूस सुनील गायकवाड, प्रा. राजेश बाहेती, कन्या सेलू केंद्र प्रमुख शेख मोजम,सीपीएस डासाळा केंद्र प्रमुख विजय तुरकर,प्रशांत रघुवंशी , सामाजीक कार्यकर्ते विक्रांत पाटील, देवेंद्र कुरा, निर्मिक कोचिंग क्लासेस चे संचालक शुकाचार्य शिंदे, आदिची उपस्थिती होती. प्रस्ताविक सुनील गायकवाड यांनी केले. ते म्हणाले की मागील 8 वर्षात 2793 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असून सेलू शहरातील एकूण 5 शाळेत हा उपक्रम राबवल्या जातो . आज उद्घाटनाप्रसंगी 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले हात मदतीचा हा उपक्रम सेलू शहरातील दानशुरांचा आहे सर्वांच्या सहकाऱ्यांने हा उपक्रम सेलू शेहरात राबविल्या जातो.
पाय नाही, हात ओढा कदाचित आपल्यातलाच कोनतरी वर येईल जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे, कारण जेंव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो, तेंव्हा त्याला आपल्या जिवनातला तो क्षण देतो, जो परत कधीच नाही येत .
गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे,ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे व विक्रांत पाटील यांनी या हात मदतीचा उपक्रमाचे कौतुक केले असून सेलू शहरातील दानशुरांनी आर्थिक सहकार्य करावे व या कार्यक्रमास मोठे करावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार योगेश ढवारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमिता जवळेकर, जयश्री सोन्नेकर, कृष्णा पांचाळ, रुपाली कुर्डे, धीरज दूधगोंडे, सेवक विठ्ठल काळे,बाबासाहेब बदाले,श्याम मुंडे आदिनी परिश्रम घेतले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!