
मुबई – प्रतिनिधी – डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन यांच्या वतिने हत्तीवडे ता. आजरा गावचे सुपुत्र मुबई स्तीत कु.प्रितीश आनंदा पाटील चार्टर्ड अकाउंटंट C.A. परीक्षा पास झालें बदल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास परिषद मुबई विभाग संपर्क प्रमुख सुधीर पोवार होते.डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशनचे संस्थापक डॉ. सचिन पोवार यांच्या हस्ते C.A. कु. प्रीतीश आनंदा पाटील व त्याच्या परिवार यांच्या सत्कार करण्यात आला. मुबई येथे
मातृछाया हॉल मध्ये कार्यक्रम पार पडला.
प्रास्ताविक व स्वागत डॉ. पोवार ट्रस्ट अँड फौंडेशनच्या उपाध्यक्षा सौ संगीता भोसले यांनी करून C.A.पाटील हे सर्वसामान्य कुटूंबातील आहेत.
डॉ.पोवार म्हणाले, C. A.पाटील यांनी नवीन मुलांनी आदर्श घेण्यासारखे काम केले असून 10- 10 च्या खोलीत कमी जागेत त्यांनी केलेल्या अभ्यासाचे योग्य नियोजनाचे चांगले फळ मिळाले.
सत्कार ला उत्तर देणाताना C.A.पाटील म्हणाले, “नवीन युवकांना एवढेच सांगणे अभ्यासात सातत्य, चिकाटी आत्मविश्वास म्हणजे आजचा संघर्ष उद्याचा यशस्वी इतिहास घडवतो”असे उत्तर दिले.
यावेळी अजित देसाई, आनंदा पाटील अक्षय , सदेश शिवगण, सूरज शेटगे,अशोक तेजम, श्रीधर वास्कर व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन कोरोग्राफर श्री पोवार यांनी तर विद्यार्थी विकास परिषद,कोल्हापूर महाराष्ट्र राज्य मुबई प्रदेश उपाध्यक्ष नितीन पाटील यांनी केले.











