Edition

रायबागमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रायबाग प्रतिनिधी : संभाजी चव्हाण,

रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर येथील आदर्श बारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका इमारतीच्या पायऱ्यांजवळ बुधवारी सकाळी सुमारे १० वाजता ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे थंडीचा कडाका वाढला होता. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा झोपेतच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृतदेह रायबाग सार्वजनिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची उंची सुमारे ५.५ फूट असून त्याने निळ्या, पांढऱ्या व तपकिरी पट्टे असलेला चेक्सचा लांब बाह्यांचा शर्ट, फिकट निळ्या रंगाची पँट आणि कमरेला काळा पट्टा परिधान केला आहे.
मृत व्यक्तीच्या छातीवर इंग्रजीत ‘Ratan’ असा टॅटू आहे. उजव्या हातावर ‘Ambika’ असा टॅटू असून बैलाचे चित्र असलेला टॅटूही आहे. डाव्या हातावर अंजनेय, विंचू आणि ड्रॅगनचे टॅटू आहेत.
या वर्णनावरून कोणाला संबंधित व्यक्तीबाबत माहिती असल्यास किंवा मृत व्यक्तीचे नातेवाईक असल्यास त्यांनी तात्काळ रायबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क : रायबाग पोलीस ठाणे : ०८३३१-२२५३३३
पीआय, रायबाग पोलीस ठाणे : ९४८०८०४०६०

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!