
शमनेवाडी प्रतिनिधी राजू संकपाळ,
बेडकिहाळ – येथील रहिवाशी युवक अमोल अशोक चौगले, वय वर्ष 36 याचे विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली.
सदलगा पोलिसांकडून माहितीनुसार अमोल चौगुले हा बाहेरगावी कामानिमित्त वरचेवर जात येत होता. काही दिवसा पूर्वी घरातून बाहेर गेलाला हा युवक घरी परत आला नाही . त्याच्याकडे मोबाईल नसल्याने घरच्याचा संपर्क झालेला न्हवता. घरी न सांगता वारंवार तो कामासाठी हिंगडत होता. म्हणून नातवाईक त्याचा शोध घेतले नाहीत. गुरुवार दिनांक 23 रोजी सकाळी बेडकिहाळ सर्कल मार्गांवरील संदीप पाटील यांच्या शेतातील विहिर परिसरात दुर्गंधी पसरली होती. तेव्हा विहिरीत प्रेत पडल्याचे दिसून आले. सदरची खबर वाऱ्या सारखी गावात पसरली, तर तेव्हा सदरचा मृतदेह अमोल चौगले याचाच आल्याचे ओळख पटली. तीन ते चार दिवस प्रेत पाण्यात पडल्याने प्रेत सडले होते. व परिसरात दुर्गंधी पसरली होती.
सदर घटनेची नोंद सदलगा पोलिस स्टेशन मध्ये झाली असून, पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस एस जमकोळी, व इतर पोलिस सहाय्यकांच्या उपस्थित प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. प्रेताची उत्तर तपासणी खडकलाट आरोग्य केंद्रातचे वैद्याधिकारी डॉ शीतल कुलकर्णी यांनी करुन नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत चौगले याचे मागे आई, भाऊ, असा परिवार आहे.










