Edition

गांधीनगरातील श्री बिरेश्वर क्रेडिट सोसायटीकडून सभासद कल्याण निधीतून लाभार्थ्यांना आर्थिक मदत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:- प्रतिनिधी उदय साळुंखे, (ता. करवीर) येथील श्री बिरेश्वर को-आंप क्रेडिट सोसायटी लि. एक्संबा मल्टीस्टेट शाखा गांधीनगर यांच्या वतीने सभासद कल्याण निधीतून चिंचवाड (ता करवीर) येथील कर्जदार मुमताज जहांगीर मुजावर यांना पती जहांगीर मुजावर यांच्या निधनानंतर ३०हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली. यावेळी शाखा सल्लागार समितीचे संचालक किरण घाटगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
जोल्ले उद्योग समूहाच्या महाराष्ट्र कर्नाटक गोवा या ठिकाणी 233 संस्था कार्यरत आहेत. गांधीनगर येथील संस्थेत अडीच वर्षांत जवळपास सव्वातीन कोटीच्या ठेवी आणि ६३ लाखाच्यावर कर्ज वितरित केले असून २४० महिलांना अमूल्या कर्ज योजना मार्फत लाभ देण्यात आला आहे. त्यापैकी तीन महिलांना संस्थेकडून मरणोत्तर निधी मंजूर करून देण्यात आला आहे. दरम्यान संस्थेचे संस्थापक मा.खा. अण्णासाहेब जोल्ले, सहसंस्थापिका आ. शशिकला जोल्ले, यांचे लाभार्थ्यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास उद्योजक अमित बटेजा,बाबुराव कोळी, नागेश जयगोंडे, हारुण सनदे, उदय पाटील, विशाल पिंजानी, गांधीनगरचे शाखाधिकारी उदय शिंदे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!