Edition

शौर्यगाथा’ मंचावर उलगडला एका रणरागिणीचा प्रेरणादायी प्रवास… ११ कॅम्प्स पूर्ण करण्याचा विक्रम प्रियदर्शिनी सत्यजित नाईक तिचा हा थक्क करणारा प्रवास देशोदेशीच्या तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा /प्रतिनिधी -:
“एक स्त्री ज्यावेळी पाय रोवून उभी राहते तेव्हा ती संकटांनाही नमवते आणि जेव्हा खांद्यावर वर्दी चढते तेव्हा ती देशाच्या संरक्षणाची आणि स्वाभिमानाची नवी व्याख्या लिहिते,” याचाच प्रत्यय सांगलीच्या एका तरुणीने आणून दिला आहे. सांगलीतील श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाची (KWC) ‘बेस्ट स्टुडंट’ आणि राष्ट्रीय छात्र सेनेची (NCC) ज्युनियर अंडर ऑफिसर प्रियदर्शिनी सत्यजीत नाईक हिची वर्ष २०२५ ची ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून निवड झाली असून, तिचा हा थक्क करणारा प्रवास देशोदेशीच्या तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या याच शौर्याचा प्रवास नुकताच ‘शौर्यगाथा’ या विशेष मुलाखत मंचावर उलगडला.

​११ कॅम्प्स पूर्ण करण्याचा अनोखा विक्रम
​प्रियदर्शिनी नाईक हीचा एनसीसीमधील प्रवास हा केवळ एक अनुभव नसून तो देशातील प्रत्येक मुलीला ऊर्जा देणारा एक धगधगता इतिहास आहे. एनसीसीच्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या ‘C’ सर्टिफिकेट परीक्षेत ‘ए’ (A) ग्रेड मिळवून तिने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली. यासोबतच, तिने एकामागून एक तब्बल अकरा (११) कठीण कॅम्प्स यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये राजस्थानमधील ‘अ‍ॅडव्हान्स लीडरशिप कॅम्प’, साहसाची पराकाष्ठा करणारा ‘शिवाजी ट्रेल ट्रेक कॅम्प’ आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘आरडीसी’ (RDC) व ‘टीएससी’ (TSC) यांसारख्या राष्ट्रीय व आंतरशाखीय कॅम्प्सचा समावेश आहे.
​महान व्यक्तिमत्त्वांकडून कौतुक
​प्रियदर्शिनी नाईकचे वक्तृत्व, नेतृत्वक्षमता आणि आत्मविश्वास कमालीचा प्रभावी आहे. तिच्या या अफाट कामगिरीमुळे कोल्हापूर ग्रुपच्या वतीने तिला ‘विशेष कौतुक पत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, महाराष्ट्र एनसीसीचे माननीय एडिजी जनरल विवेक त्यागी आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांना एनसीसीच्या कामगिरीबद्दल अत्यंत आत्मविश्वासाने ब्रीफिंग करण्याचे अभूतपूर्व भाग्य प्रियदर्शिनी नाईकला लाभले आहे. कॉलेज आणि आंतर-कॉलेज पातळीवरील वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांमध्येही तिने अनेक पदके पटकावली आहेत.
​पालकांसाठी आणि तरुणींसाठी आदर्श
​’शौर्यगाथा’ मंचावरील तिच्या मुलाखतीतून एनसीसीचे संस्कार एका मुलीचे आयुष्य कसे बदलू शकतात आणि तिच्यात देशप्रेमाची ज्योत कशी पेटवू शकतात, हे स्पष्ट झाले. पालकांनी आपल्या मुलींना एनसीसीमध्ये का पाठवावे आणि आजच्या तरुणींनी देशासाठी कसे सज्ज व्हावे, याचा एक नवा मार्गच प्रियदर्शिनीने दाखवून दिला आहे. “इच्छाशक्ती असेल तर कोणतीही शिखरं सर करता येतात,” हेच प्रियदर्शिनीने आपल्या कार्यातून सिद्ध केले असून तिच्यावर सांगली जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फोटो ओळ-:सांगलीचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची नात प्रियदर्शिनी सत्यजित नाईक ठरली एनसीसीची ‘बेस्ट कॅडेट

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

traffic tail

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

error: Content is protected !!