Edition

सेवानिवृत्त जीवन समाजसेवेसाठी अर्पण करावे – बी.के. पुष्पा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रायबाग प्रतिनिधी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विद्यापीठाच्या रायबाग केंद्रप्रमुख बी.के. पुष्पा यांनी सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित करून मानवी जीवनाचे सार्थक केले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
शनिवारी शहरातील कर्नाटक सार्वजनिक (सरकारी) शाळेचे सहशिक्षक महादेव कंबर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नदी इंगळगाव मुरुगेंद्र शिवयोगी मठाचे सिद्धलिंग स्वामीजी होते. यावेळी ज्येष्ठ नेते डी.एस. नाईक, उपप्राचार्य बी.एम. माळी, एच.ए. भजंत्री, बसवराज कांबळे, बी.एल. घंटी, व्ही.बी. रगे, कारेप्पा नाईक, डी.एस. दिग्रज, कुमार आवळे, जिनेंद्र निलजगी, गणराज नाईक, विश्वनाथ यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेवेतून निवृत्त झालेल्या महादेव कंबर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

“मोजणीला आले तर रक्त सांडू”: ऐतवडे खुर्दचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध, शेतकरी नेते हनुमंत पाटलांचा सरकारला थेट इशारा.. 2019 च्या महापुरात 85% गाव पाण्याखाली, महामार्ग झाला तर 100% गाव बुडणार; “आम्ही आत्महत्या करणार नाही, लढू” – भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकरी आक्रमक.

traffic tail
error: Content is protected !!