विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी सदलगा.
सदलगा (ता.चिकोडी)येथील आचार्य विद्यासागर सहकारी संघ नियमीत, सदलगा या संस्थेच्या वाळकी येथील पाचव्या शाखेचे उद्घाटन गुरुवारी (दि. २९) मोठ्या उत्साहात व दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले. शाखेच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तब्बल ७० लाख रुपयांहून अधिक ठेवी जमा झाल्या. यामुळे संस्थेच्या विस्ताराला आणि ग्राहकांच्या विश्वासाला बळ मिळाले आहे.
प्रारंभी श्री १००८ शांतीनाथ भगवान , संत शिरोमणी आचार्य भगवान श्री १०८ विद्यासागर महाराज, श्री सरस्वती माता , श्री लक्ष्मी माता प्रतिमेचे विधिवत पूजन प्रतिमाधारी प्रथमाचार्य माणिक चंदगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर निपाणी येथील समाधी मठाचे मठाधिपती श्री प्राणलिंग स्वामीजी व अन्य स्वामीजी , मान्यवरांच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बिरसिद्धेश्वर विविध उद्देशीय सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष आदप्पा नेमण्णा गिजूणे व श्री आदिनाथ विविध उद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष दरेप्पा रामप्पा हवालदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक सुकुमार आदप्पा गिजूणे होते.
यावेळी सदलगा मुख्य शाखेचे अध्यक्ष देवेंद्र गिजूने, उपाध्यक्ष प्रदीप इंगळे, वाळकी शाखेचे अध्यक्ष अनिल संकनवाडे, उपाध्यक्ष महेश भरत पाटील, संचालक रामू शंकर कमते, रुद्राप्पा भीमू वडगिरे, राजू सदाशिव पाटील, नंदकुमार श्रीकांत खोत, रमेश कल्लाप्पा उमराणे, शिवप्रसाद रवींद्र गंधगुडे, शांतिनाथ फारिस गोमाई, सुनील अप्पासाहेब हनीमनाळे, श्रीकांत रावसाहेब शिंदे, सदाशिव मारुती नाईक, लक्ष्मण हुलेप्पा मधाळे, भाग्यश्री जितेंद्र गोमाई, अनुराधा सचिन खोत, जनरल मॅनेजर राणी प्रमोद सोमनखोत, कार्यदशी श्रद्धा विजय शेटे,शाखा व्यवस्थापक प्रतीक नेमिनाथ मोकाशी यांच्यासह सर्व शाखांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, सभासद, हितचिंतक, व्यापारी, शेतकरी तसेच वाळकी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शाखेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आधुनिक व विश्वासार्ह सहकारी आर्थिक सेवा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
सन २०१६-१७ मध्ये स्थापन झालेल्या आचार्य विद्यासागर सहकारी संस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सदलगा येथे मुख्य कार्यालय असलेल्या संस्थेने आता वाळकी येथे पाचवी शाखा सुरू करून आपला कार्यविस्तार केला आहे. आकर्षक व्याजदराच्या ठेव योजना, मुदत ठेवींवर ११ टक्क्यांपर्यंत व्याज आणि आवर्ती ठेव योजनांमुळे ग्राहकांना बचतीची चांगली संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
पहिल्याच दिवशी ७० लाखांहून अधिक ठेवींची नोंद होणे ही संस्थेच्या विश्वासार्हतेची पावती मानली जात असून, भविष्यात वाळकी व परिसरातील नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही शाखा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक चंदगडे यांनी करून शेवटी आभार मांनले.










