Edition

घोडावत विद्यापीठात ‘स्टार बिझ बझार २०२६’चे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या वतीने ‘स्टार बिझ बझार २०२६’ या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या कॅम्पस फूड कोर्ट येथे उत्साहात संपन्न झाले. ‘व्हेअर क्रिएटिव्हिटी मीट्स कॉमर्स’ अर्थात ‘जेथे सर्जनशीलता आणि वाणिज्य यांचा संगम होतो’ ही या उपक्रमाची संकल्पना आहे.

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, उद्योजकीय कौशल्ये, व्यावसायिक कल्पकता आणि व्यापारविषयक क्षमता यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या बझारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात साकारण्याची, उत्पादनांचे व सेवांचे सादरीकरण करण्याची तसेच ग्राहकांशी संवाद साधून व्यवसायाचे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या उपक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे समन्वयन करण्यात आले.

‘स्टार बिझ बझार’ हा केवळ विक्रीचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण देणारा एक महत्त्वपूर्ण मंच आहे. नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, विपणन, ग्राहकाभिमुखता, संवादकौशल्ये आणि संघभावना यांसारख्या व्यावसायिक गुणांचा विकास करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.

हा उपक्रम शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजीही सुरू राहणार असून, सायंकाळी ४ वाजता समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यावसायिक संधींची जोड देत त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला चालना देण्याच्या दृष्टीने ‘स्टार बिझ बझार २०२६’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

traffic tail

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

error: Content is protected !!