Edition

ईश्वरपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! तब्बल १८ लाख ४० हजार रुपये किमतीचे १०४ गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या हस्ते मोबाईलचे वितरण; नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपूर : गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात ईश्वरपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह परराज्यांतून तब्बल १०४ मोबाईल हँडसेट शोधून काढले. या मोबाईलची एकूण किंमत १८ लाख ४० हजार रुपये असून, ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या हस्ते संबंधित मोबाईलधारकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले.
ईश्वरपूर हे सांगली जिल्ह्यातील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. परिसरातील विविध गावांमधून नागरिक नोकरी, शिक्षण आणि खरेदीसाठी दररोज शहरात येत असतात. त्यामुळे बाजारपेठ, बसस्थानक तसेच प्रवासादरम्यान गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत ईश्वरपूर पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या होत्या.
या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ मोबाईलचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. पोलिसांनी विविध तांत्रिक बाबींचा तपास करून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांसह परराज्यांतून गहाळ झालेले १०४ मोबाईल शोधून काढले.
त्यानंतर हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून गहाळ झालेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने संबंधित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच ईश्वरपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि ईश्वरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ कुबेर खोत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत, शशिकांत शिंदे, दीपक घस्ते, विशाल पांगे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
गहाळ मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्याच्या या कामगिरीमुळे ईश्वरपूर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!