इचलकरंजी : प्रतिनिधी — शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९५/२०२६ मधील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना दि. ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धनाजी शामराव मंडले (वय ३८, रा. बानुरगड, ता. खानापूर, जि. सांगली) आणि अविनाश भीमराव बनसोडे (वय ४२, रा. कुष्ठरोग वसाहत, रिंग रोड, बिग बाजारसमोर, इचलकरंजी) यांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून सुरू असून, पोलीस कोठडीदरम्यान गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करण्यात येत आहे.











