
गांधीनगर:प्रतिनिधी
उदय साळुंखे
गांधीनगर ता. करवीर येथील होलसेल व्यापारी असोसिएशनच्या
सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी अध्यक्षपदी सलग अशोक दुसऱ्यांदा टेहल्याणी यांची तर उपाध्यक्षपदी बक्षाराम दर्डा यांची निवड झाली. सचिवपदी कट्टार, सहसचिवपदी हिराला गिदवाणी, खजानिसपदी मुरली अडवाणी, लेखापरीक्षकपदी सुरेश टेहल्याणी सहलेखा परीक्षकपदी हरिदास कुकरेजा यांच्या बिनविरोध निवडी झाल्या. पुढील तीन वर्षांसाठी या निवडी झाल्या. विशेष सल्लागारपदी सेवाराम तलरेजा तर गोपाल निरंकारी, प्रकाशलाल विधाणी, बाजुमल आहुजा, महेंद्र जसूजा, रिकी सचदेव, मनोज वंजाणी, विनोद वधवा, मुकेश रोहिडा, सनी चंदवाणी, सुरेश वासवाणी यांची सल्लागारपदी निवड झाली.











